माजलगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
माजलगाव : माजलगाव ते गुजथंडी फेरीसाठी जात असताना बस गुंजथडी गावाजवळ गेली असता म्हस, गायी संभाळणाऱ्याकडून एसटी बस अडवून शिवीगाळ करत चालकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी ५ वाजण्याचे सुमारास घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत पंढरीनाथ नाटकर (वय ५१ वर्षे, रा. फुले नगर, माजलगाव) यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यातीत म्हटले आहे की, चालक नाटकर हे माजलगाव ते गुंजथडी बस फेरीसाठी गुरुवारी (ता.२) जात होते. यादरम्यान बस गुंजथडी जवळ आली असता गोविंद नारायण नायबळ रोडवरून म्हशी व गायी घेऊन जात होता. रस्ता सोडण्यासाठी मी हॉर्न वाजऊन रस्ता इशारा देत होतो. यावर नायबळ हा म्हशी व गायी रोडवर उभ्या करून एसटी अडवत माझ्याकडे आला, चालक साईडचा दरवाजा उघडून शिवीगाळ करत लाथा बुक्यानी मारहाण करू लागला. रोड तुझ्या बापाचा आहे का ? तू गुंजथडी गावात ये तुझे हात पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी एसटी बस चालक श्रीकांत पंढरीनाथ नाटकर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद नारायण नायबळ (रा. गुंजथडी ता.माजलगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
