अदानींना धक्यावर धक्के !

Spread the love

जगात दुसऱ्या अन् आपल्या देशात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरलेले गौतम अदानी यांच्या यशाचा डोलारा ढासळू लागला आहे. दोन महिन्यापूर्वीच जगभरात अदानी यांच्या यशाचे गोडवे गायले जाऊ लागले. मात्र आत्ता त्यांना धक्यावर धक्के बसत आहेत. ही बाब अदानी यांच्या उद्योग समुहसह देशासाठी चिंताजनक आहे.

गौतम अदानी यांची जगभरात चर्चा चालू असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या शाश्वत कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या US स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्रायजेसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. परिणामत: भारतीय शेअर बाजारात अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये सकाळी 35 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 50% घसरण नोंदवली गेली तर आज दुपारी शेअर्समध्ये रिकव्हरी झाली तरीही 2.42 च्या सुमारास एका शेअरची किंमत 1535 रुपये झाल्याचं दिसलं. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर 3500 रुपयांच्या जवळपास होता. मागील 9 दिवसांमध्ये कंपनीचे शेअर्स 70% घसरले आहेत.

Leave a Reply