आमदार सोळंकेच्या राष्ट्रवादीला धक्का; विद्यमान नगरसेवकाचा जगतापाच्या राष्ट्रवादीत प्रवेश !

Spread the love

माजलगाव :- आमदार प्रकाश सोळंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या धामधुमीत पहिलाच झटका देत. मोहन जगताप यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विद्यमान नगरसेवकाला प्रवेश घडवून आणला. यातून एक प्रकारे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचा श्रीगणेश जगताप केला आहे.

माजलगाव नगर परिषद निवडणुकीची निवडणूक चांगलीच जोर धरत आहेत. यातच अनेक ठिकाणी प्रभागात झालेल्या फेरबदल व आरक्षण बदलामुळे विद्यमान नगरसेवक, भावी उमेदवारांचे गणित बिघडले. त्यामुळे आत्ता जो तो आपली उमेदवारी शाबुत ठेवण्यासाठी भावी, विद्यमान नगरसेवकांनी पक्ष बदलासाठी चाचपणी करत असल्याचे कळते. मात्र यात पहिला पाऊल मोहन जगताप यांनी टाकत आमदार प्रकाश सोळंके यांना धक्का देत, त्यांचे खंदे समर्थक विद्यमान नगरसेवक भागवत भोसले यांनी जगतापांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे फोडाफोडीचे सुरुवात मोहन जगताप ह्यांनी केली असल्याने प्रकाश सोळंके काय करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply