माजलगाव, दि.३०: बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठीची अडीच वर्षांची आरक्षण सोडत मंगळवारी (आज) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीतून तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाकरीता विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) शैलेश सुर्यवंशी आणि उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरक्षण सोडत करण्यात आली, त्यात माजलगाव पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधारण महिले करिता राखीव झाले आहे. यामुळे अनेक मातब्बर पंचायत समिती सभापती पदाकरीता मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या आरक्षण –
अनुसूचित जाती : परळी
ओबीसी : बीड
ओबीसी महिला : गेवराई, धारूर
सर्वसाधारण महिला : माजलगाव, आष्टी, शिरूरकासार, अंबाजोगाई
सर्वसाधारण : केज, वडवणी, पाटोदा
