माजलगाव पालिकेच्या घंटा गाड्यांना आग, दोन गाड्या जळून खाक !

Spread the love

माजलगाव : माजलगाव नगर परिषदेच्या मालकीच्या ९ घंटा गाड्याला आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. यातील दोन गाड्या आगीने उग्र रूप धारण केल्याने जळून खाक झाल्या आहेत.

माजलगाव नगर परिषदेच्या घंटा गाड्या व इतर वाहने ही पंचायत समिती कार्यालय अरोसरत असलेल्या जागेत पार्किंग केलेल्या आहेत. त्या ठिकाणी अचानक आज (ता.४) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आग लागली. अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. या आगीत ९ गड्यापैकी २ गाड्या आगीने उग्र रूप धारण केल्याने जळून खाक झाल्या, तर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण समोर आले नाही, मात्र ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Leave a Reply