माजलगाव शहर पोलिसात सुशिल सोळंकेसह दोघांवर गुन्हा दाखल
माजलगाव, दि.१५: शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक शनिवारी पहाटे शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण कधी पुतळा उभारला. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशिल सोळंकेसह बाळराजे आवारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी माजलगाव नगर परिषदेचे कर्मचारी आनंत नामदेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांचे कडुन कळाले की, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा स्थापन केलेला आहे. तुम्ही पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे जावुन पुतळा बसवणारे इसमा विरुध्द कायदेशीर तक्रार द्या. त्यानुसार मी छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव येथे जावुन पाहिले असता; छत्रपती संभाजी महाराज यांचा अंदाजे ८ फुट उंचीच्या एका लोखंडी चबुतऱ्यावर चिटकवलेल्या बॅनरवर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांचे नाव फोटो दिसत असुन त्यावर अंदाजे ८ फुट उंचीचा अनाधिकृतपणे पुर्णाकृती पुतळा स्थापन केलेला दिसला. त्यानंतर मी व माजलगाव शहर पोलीस ठाणे येथील पोलीस उप निरीक्षक के. बी. माकणे यांनी पोलीस स्टेशन येथील सि.सि.टि.व्हि. रेकॉर्ड पाहिले. त्यामध्ये दिसत आहे की, सुशील सोळंके रा. सादोळा ता. माजलगाव हे व सोबत ८ ते १० इसम हे छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव येथे पुतळा बसवतांना दिसत आहेत.यातून एक प्रकारे मा. जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता अनधिकृतपणे पुतळा बसवलेला आहे. म्हणुन माझी बाळराजे आवारे पाटील 2. सुशील सोळंके रा. सादोळा ता. माजलगाव व इतर ८ ते १० इसम यांचे विरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
