माजलगाव : तालुक्यातील डेपेगाव येथील स्कॉर्पिओने बारा जन लग्न समारंभासाठी लिंबा (ता.पाथरी जि.परभणी) येथे जात असताना पाथरी ते सोनपेठ रस्त्यावरील कानसुर फाटा येथे टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन अपघात झाला. यातील १२ जन जखमी झाले असून प्राथमिक उपचार पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात करून परभणी येथे उपचारार्थ दाखल केले आहे. सुदैवाने यात कुणास जिवीत हानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील डेपेगाव येथिल सरपंच दत्तात्रय तुकाराम कोकाटे, उपसरपंच दत्तात्रय बालासाहेब काळे हे गावातील१० लोकांना घेऊन लग्न समारंभासाठी लिंबा येते जात होते. या दरम्यान पाथरी ते सोनपेठ रोडवरील कानसुर वस्तीजवळ आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्काॅपिओ गाडीचे (एम.एच.46, ए-डि.5445) टायर फुटले. यात गाडी पलटी होऊन गाडीतील १२ जणं जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेऊन 112 या क्रमांकावर काॅल करुन पोलिसांना दिली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सर्व जखमींना पाथरी ग्रामीन रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे परभणीला हलविण्यात आले आहे.
या अपघातात माजलगाव तालुक्यातील डेपेगांव येथील सरपंच दत्ताञय तुकाराम कोकाटे (वय 38), दत्ताञय बाळासाहेब काळे (वय 42), सुवर्णा किशोर काळे (वय 31), गणेश अशोक ढेरे (वय 24), विलास अच्चुतराव राउत (वय 48), तारामती प्रभाकर काळे (वय 50), पांडुरंग गणेशराव काळे (वय 35), रेणुका भगवान गायकवाड (वय 40), मधुबाई ढवळे, शकुंतला दत्ताञय काळे (वय 45), सुरेश किशोर काळे (वय 12), भगवान रामभाऊ गायकवाड (वय 58) सर्व रा.डेपेगाव ता.माजलगाव येथील रहिवाशी असून हे जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नसून सर्वांची प्रकुती चांगली आहे.
