महानगरपालिका, नगर पालिकेच्या सदस्यांना नगरसेवक म्हणतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र हे नगरसेवक शब्द येण्यामागचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? नाही ना तर तोच आज आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वी महानगरपालिका, नगर पालिकाच्या सदस्यास इंग्रजीत सिटी फादर्स असे म्हणत. त्यावरून मराठीत नगरपिते असा शब्द सुचवला गेला होता. परंतू यावर आक्षेप घेत मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, वक्ते तथा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते असणारे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी आम्हाला इतके बाप नकोत अशी टिप्पणी करत, त्या वेळच्या व्यवस्थेचे लक्ष वेधले होते. अत्रे यांच्या सूचनेनुसार पुढे नगारपिते हा शब्द प्रयोग जाऊन आत्ता जे तुम्हा आम्हाला माहीत असलेला नगरसेवक म्हणून बोलले जाऊ लागले.
