गांधीनगर : बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा आज (मंगळवारी) सुनावली. यासह पीडितेला 50 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती, २०१३ मध्ये दाखल झालेल्या महिला शिष्य वरील बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने आध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आज (ता.३१) निकाल देत सत्र न्यायाधीश डी.के.सोनी यांनी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासह पीडितेला 50 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकरणात
आसारामच्या पत्नीसह सहा जणांची न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
