डीएड, बीएड उमेदवारांसाठी अखेर आनंदाची बातमी मोठी !

Spread the love

मागील पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा आता संपली आहे. आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची अखेर घोषणा करत, राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यातील 3 लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत असतांना आता परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 8 फेब्रुवारी आहे.

वेळापत्रक :

31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. परीक्षा शुल्क 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 वाजेपर्यंत भरू शकतात, तर प्रवेशपत्र 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून मिळणार आहेत. परीक्षेच्या तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्च 2023 पर्यंत.

Leave a Reply