-
केदारेश्वर अर्बनच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य
माजलगाव : येथील केदारेश्वर अर्बन बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त आज साय. ५ वाजता प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन मोंढा मैदान येथे करण्यात आले आहे. या किर्तन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन भगवान कदम यांनी केले आहे.

शहरातील केदारेश्वर अर्बन बँकेचा तिसरा वर्धापन दीन सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त दि.२७ जानेवारीला ह.भ.प. प्रकाश महाराज बांधले यांचे कीर्तन संपन्न झाले. तर आज दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घघाटन आ.प्रकाश सोळंके हे होते तर अध्यक्षस्थानी माजी आ.राधाकृष्ण होके पाटील हे होते. संपादक शिवाजी रांजवन, नितीन नाईकनवरे, संभाजी शेजुळ, चंद्रकांत शेजुळ आदी उपस्थित होते.
तसेच आज साय ५ वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तनाचे आयोजन मोंढा मैदान येथे होणार आहे. या किर्तन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन भगवान कदम यांनी केले आहे.
