तुमचे शरीर यमाच्या हातात द्या, डॉक्टरच्या नाही – ह.भ.प. इंदोरीकर

Spread the love

माजलगाव : आज सर्वत्र जो तो माया जमवण्याच्या मागे लागला आहे. त्यामुळे मात्र स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. सर्व आहारातून केमिकल घेत आहे. त्यामुळे वेळीच शहाणे होऊन… तुमचे शरीर यमाच्या ताब्यात द्या, डॉक्टरच्या ताब्यात देऊ नका असे आवाहन प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.


येथील केदारेश्वर अर्बन बँकेच्या वतीने आज दि.२८ शनिवारी तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोंढा मैदान येथे सायं ५ वाजता आयोजित किर्तन महोत्सव किर्तन प्रसंगी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर बोलत होते. याप्रसंगी आ.प्रकाश सोळंके, केदारेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन भगवान कदम यांच्या हस्ते सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना ह.भ.प. इंदोरीकर म्हणाले, सर्वांना आज दोन माणसांना बंगला, चारचाकी गाडी पैसा असावा वाटतोय. मात्र यामध्ये आपण आपल्या दैंनदीन आहारात केमिकलयुक्त अन्न खात आहोत. त्यामुळे अनेक कुटुंबात शुगर, कॅन्सर व इतर आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळीच जागृत होऊन स्वतःच्या शरीर संपत्तीकडे लक्ष द्या. तुमचे शरीर यमाच्या ताब्यात द्या, डॉक्टरच्या ताब्यात देऊ नका … असे आवाहन केले. तसेच प्रत्येक सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शाळा – कॉलेजच्या वेळेत मोबाईल बंद करा. लहान लेकराचा मोबाईल वापर वेळीच बंद करा असे ह.भ.प.इंदोरीकर यांनी सांगितले.

Leave a Reply