प्रशासनाने मागितला कारवाईसाठी १५ दिवसाचा वेळ
माजलगाव : माजलगाव शहरातील ओपन स्पेस वरील अतिक्रमणे हटवणे व इतर मागण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके हे ३१ जानेवारी २०२३ रोजी उपोषण करणार होते. मात्र आज दि.२७ (शुक्रवारी) उपविभागीय अधिकारी कार्यालयात sdm निलम बाफना यांच्या उपस्थितीत आ.प्रकाश सोळंके यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्यासाठी १५ दिवसाचा वेळ मागत, उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावर आ.सोळंके यांनी उपोषण स्थगित करत. आठवडा भरत कारवाईचे हालचाली न दिसल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा दिला आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांनी दि.२४ जानेवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत, कारवाई करण्यासंदर्भात उपोषणाचा इशारा दिला होता. या निवेदनात शहरातील ओपन स्पेस वरील अतिक्रमणे दूर करावीत. राष्ट्रीय महामार्ग 548-सी पॅकेज माजलगाव ते परतूर रस्त्याचे अपूर्ण खराब काम. राष्ट्रीय महामार्ग-61 मधील बायपासचे अपूर्ण काम, राष्ट्रीय महामार्ग 548-सी पॅकेज माजलगाव ते केज मधील खराब रस्ता व धारूर घाट कटिंग याचा निपटारा करण्याची मागणी केली होती.
यावर प्रशासनाने दाखल घेत आज दि.२७ शुक्रवारी माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात आ.प्रकाश सोळंके यांच्यासोबत बैठकीचे आयोजन sdm निलम बाफना यांनी केले होते. यावेळी माजलगाव नगर परिषदेचे प्रशासक निळेकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.सोळंके यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्यासंदर्भात १५ दिवसाचा वेळ मागत उपोषण स्थगित करण्यात यावे अशी विनंती केली. यावर आ.प्रकाश सोळंके यांनी उपोषण स्थगित करत, दोन आठवड्यात कारवाई संदर्भात हालचाली दिसल्या नाहीत. तर उपोषणावर ठाम राहण्याचा इशारा दिला. त्या बाबत आ.सोळंके यांनी लेखी प्रशासनाने पत्र देऊन उपोषणापासून परावृत्त केले.
