रत्नसुंदर हॉस्पिटलला रिव्हाईज बांधकाम परवाना देवू नये

Spread the love
  • सुभाष नाकलगावकर यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण

माजलगाव : माजलगाव शहरातील होत असलेल्या रत्नसुंदर हॉस्पिटलच्या अनाधिकृत बांधलेल्या इमारतीला रिव्हाईज बांधकाम परवाना, माजलगाव नगर परिषदेने देऊ नये यासाह विविध मागण्यासाठी पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपविभागीय कार्यालय समोर आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे.

माजलगाव शहरात बायपास रस्त्यावर होत असलेल्या रत्नसुंदर हॉस्पिटलच्या इमारतीचे काम चालू आहे. याकामी नियमाची पायमल्ली करून ही इमारत उभारली जात आहे. याबाबत सुभाष नाकलगावकर यांनी वारवार नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. मात्र त्यावर कारवाई न करता न. प. प्रशासन रत्नसुंदर हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधलेल्या इमारतीला रिव्हाईज बांधकाम परवाना देवु नये करत आहे. तो बांधकाम परवाना देऊ नये. यासह सर्व्हे नं ३७२ मधिल गायब झालेली १ एकर ३ गुंटे जागा शोधावी. पृथ्वीराज सोळंके, रामेश्वर टवानी यांचा सन २००५ मध्ये काढलेल्या अकृषी परवान्याची चौकशी करावी. सर्व्हे नं. ३७९ मधील ओपनस्पेस वरील अतिक्रमन हटवावे. सर्व्हे नं.३७३ मधील सन २०१८ ला केलेली २२ आर ची बोगस गुंठेवारी रद्द करावी, आदी मागण्यासाठी प्रजासत्ताक दिनी दि.२६ जानेवारी गुरुवारी माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनास स्वाभिमानी रिपाईचे नेते विजय साळवे, माजी नगरसेवक राजेश साळवे, भाजपचे युवा नेते मनोज फरके, भाजप महिला आघाडीच्या संजीवनी राऊत, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, राजरत्न खळगे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.अमोल डोंगरे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ पैजणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply