-
आज आनंद गाव येथून ४ लाखाचा गुटखा केला जप्त
माजलगाव : तालुक्यातील आनंदगाव शिवारातील आनंदगाव ते मोगरा या रस्त्यावर कोठ्यामध्ये असलेला ३ लाख ९१ हजार रुपये किमतीचा बाबाजी गुटखा छापा मारून जप्त केल्याची कारवाई सोमवारी रात्री १२.३० वाजता IPS डॉ. धिरज कुमार यांच्या पथकाने केली.
IPS डॉ. धिरज कुमार यांनी माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा रुजू झाल्यापासून गुटखा माफिया विरुद्ध कारवाई मोहीम राबवत धाडसत्र सुरू ठेवले आहे. मागे दोन दिवसापूर्वी ३६ लाखाचा गुटखा जप्त करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्यातच आज दि.२३ सोमवारी आनंदगाव शिवारातील आनंदगाव ते मोगरा या रस्त्यावरील कोठ्यामध्ये गुटखा असल्याची माहिती पथकाला माहिती मिळाली. यावरून रात्री १२.३० वाजता पोलीस कॉन्स्टेबल अस्तीकुमार देशमुख, वाय.बी.चव्हाण, साधु कोकाटे यांनी छापा मारून बाबाजी गुटखा ज्याची किंमत ३ लाख ९१ हजार जप्त केला. याबाबत तपास सुरू असून दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला असून पुढील कारवाई सुरू आहे.