माजलगाव : तालुक्यातील सादोळा, सांडस चिंचोली व आबेगाव या गावात चक्क दिवसा घरफोड्या झाल्याची घटना रविवारी घडली आहे. यामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून पोलिसांना समोर चोरट्यांनी मोठे आव्हान दिले आहे.
माजलगाव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. आत्ता चोरट्यांनी तर हद्दच पार केली आहे. रविवार दि.२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दरम्यान सादोळा, सांडस चिंचोली व आबेगाव या ठिकाणी घरांचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. ह्या चोऱ्या दुचाकीवरून आलेल्या फेरी वाल्याकडून झाल्या असल्याचे बोलले जात आह
घटनास्थळी पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक झोनवाल, बोडके, प्रधान ह्यांनी भेटी दिल्या आहेत.
फेरीवाल्यांकडे जातेय संशयाची सुई…
ग्रामीण भागात शेती कामा निमित्त लोक शेतात जातात. त्याचाच फायदा उचलत फेरीवाल्यांनी याचा फायदा उचलत. ह्या घरफोड्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच दुचाकीवरून आलेल्या फेरी वाल्याकडून झाल्या असल्याचे लोकातून बोलले जात आहे.