पोलिसांसाठी आनंदाची बातमी !

Spread the love
  • राज्यातील ५२० पोलीस हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक

राज्यभरातील ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलत माहिती मागवली आहे.

गेल्या १९ जानेवारी रोजी राज्यभरातील ५२० हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच पदोन्नतीची यादी जाहीर होणार असल्यामुळे राज्यभरातील पोलीस हवालदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ह्या पोलीस हवालदारांना वगळणार

पोलीस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभागातील उपसहायक अपर्णा बागून यांनी आदेश काढून २०१३ अर्हताप्राप्त ५२० पोलीस हवालदारांची माहिती मागितली आहे. निवड झालेल्या हवालदारांपैकी ज्यांच्यावर विभागीय चौकशी, गुन्हा दाखल, प्रस्तावित चौकशी आणि शिक्षा झाली आहे त्या हवालदारांना वगळण्यात येणार आहे.

Leave a Reply