देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एक महत्वाची माहीती दिली आहे. पुढील काळात देशातील नागरिकांना आपल्या भाषेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची प्रत वाचता येणार आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं की, लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय म्हणजेच निर्णयांची प्रत हिंदीसह देशातील प्रत्येक भाषेत उपलब्ध होणार आहेत. देशातील शेवटच्या माणसाला स्वस्त आणि जलद न्याय मिळावा. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रत्येक भाषेत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.