माजलगावात हजारोच्या उपस्थितीत २१ जोडप्यांचे विवाह संपन्न

Spread the love

अल- फलाह कमिटीच्या पुढाकार

माजलगाव : अल – फलाह कमिटीच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा आज (रविवारी) दि.२२ रोजी शहरातील जिल्हा परिषद शाळा, कोर्ट रोड येथे दुपारी २.३० वाजता २१ जोडप्यांचे विवाह उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाले.


या विवाह सोहळ्यास हजरत मौलाना मुहम्मद उमरेन (मालेगाव) यांची प्रमुख होती. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री याचे खाजगी सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे, पटेल क्लिनिक माजलगावच्या संचालक डॉ.सायरा सज्जाद पटेल यांना माजलगाव भूषण पुरस्काराने मौलाना मुहम्मद उमरेन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित आले.
याप्रसंगी बोलतांना मौलाना मुहम्मद उमरेन म्हणाले, अल -फलाह कमिटी गोर गरीबांचे विवाह, रुग्णासाठी रुग्णवाहिका, १४० गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप. यासह अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत विवाहित जोडप्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
अल – फलाह कमेटी मागील ९ वर्षापासून हे विवाह सोहळे घेत असून आजपर्यत ८१ गरजुंची विवाह पार पाडलेले आहेत. जोडप्यांना अल – फलाह कमिटीच्या वतीने संसार उपयोगी वस्तू ज्यात कपाट, कॉट, कुलर यासह संपूर्ण भांडे देण्यात आली. या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

डॉ.ओमप्रकाश शेटेनी देऊ केले व्हेंटिलेटर

अल-फलाह कमिटी च्या वतीने रुग्णासाठी रुग्णवाहिका माजलगाव शहरात कार्यरत आहे. या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे कळले. यावर डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी त्यांच्या वतीने अल-फलाह कमिटीला व्हेंटिलेटर देण्याचे जाहीर केले.

Leave a Reply