-
२१ गोरगरिबांच्या मला – मुलीचे होणार विवाह
माजलगाव : मागील नऊ वर्षापासून अविरत अल – फलाह कमेटी माजलगाव च्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने उद्या दि.२२ रविवारी शहरातील जिल्हा परिषद शाळा, कोर्ट रोड येथे दुपारी २.३० वाजता २१ गोर गरीबांचे मला – मुलीचे विवाह पार पडणार आहेत.
या विवाह सोहळ्यास हजरत मौलाना मुहम्मद उमरेन (मालेगाव) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच याप्रसंगी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री याचे खाजगी सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे, पटेल क्लिनिक माजलगावच्या संचालक डॉ.सायरा सज्जाद पटेल यांना माजलगाव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अल – फलाह कमेटी मागील ८ वर्षापासून हा विवाह सोहळ्यात ८१ गरजुंची विवाह पार पाडलेले आहेत. यावर्षी ९ वे वर्ष असून २१ जोडप्यांचे विवाह लावण्यात येणार असून कपाट, कॉट, कुलर यासह संपूर्ण संसार उपयोगी साहित्य अल – फलाह कमेटीच्या वतीने देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात येणाऱ्या ५ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- सामाजिक कार्यात अल – फलाह कमेटी अग्रेसर
माजलगाव तालुक्यात सामाजिक कामात अल – फलाह कमेटी कायम अग्रेसर असते. उन्हाळ्यात २ ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शहरातील १०५ गरीब कुटुंबांना प्रत्येकी ४०० रुपयांचे जीवनावश्यक सामान देते. तसेच १३७ गरजू रुग्णावर उपचार करून त्यांना जगण्यासाठी बळ दिलेले आहे.