-
मुदत संपल्यावर होणाऱ्या प्रक्रिया बाबत चर्चेला जोर
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच पक्षाचा दाव्याबाबतचा दोन्ही गटाचा वाद न्यायालयातून आता थेट निवडणूक आयोगात पोहोचला आहे. यासंदर्भात काल(शुक्रवारी) झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
मात्र, त्यावर आयोगाने निकाल न देता, पुन्हा तारीख पे तारीख … नुसार 30 जानेवारी हि तारीख दिली आहे. अशातच येत्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढे पक्षाध्यक्षपदाचं काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून चर्चेला गती आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड पाच वर्षांसाठीच केली जाते. या कार्यकारिणीमध्ये एकूण 19 सदस्य असतात. त्यापैकी 14 सदस्यांची प्रतिनिधी सभा तयार होते असे पक्षघटनेत नमूद करण्यात आले आहे. पण आता राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी पुन्हा निवड करायची असल्यास त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीलाही मुदतवाढ मिळणं गरजेचं आहे.
तो निर्णय ही प्रलंबित …
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील निवडक सदस्य प्रतिनिधी सभेवर असतात. पक्ष प्रमुखांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते. यासंदर्भातली मागणीही ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच अध्यक्ष पद जाणार का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.