माजलगाव : आयपीएस डॉ. धिरज कुमार यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी रात्री छापे मारी करत माजलगाव व मैदा (ता.बीड) येथून ३६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करत आरोपीस ताब्यात घेतल्याची कारवाई केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, माजलगाव येथील जिजामाता नगर येथे सुनिल आश्रुबा कदम हा त्याचे राहते घरात अवैधरित्या गुटखा विक्री करण्यासाठी RMD, गोवा, राजनिवास, माल आणुन ठेवलेला आहे. याची माहिती आयपीएस डॉ. धिरज कुमार यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक भास्कर कांबळे यांना कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता सुनिल कदम यांच्या घराचा दरवाजा उघडुन झडती घेतली असता घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याचा माल मिळुन आला. RMD पान मसाला, विमल पान मसाला, राज निवास सुगंधित पान मसाला, गोवा, बाबा पान मसाला, हिरा पान मासाला, RMD सेन्टेन्ड तंबाखु, रॉयल २२० तंबाखु, जाफरानी जर्दा, रॉयल ७१७ तंबाखु, व्ही-१ तंबाखु असे २ लाख १३ हजार ६७ रुपये किमतीचा गुटख्याचा माल आरोपी सुनिल कदम यांच्या घरी मिळून आला. पथकातील अधिकाऱ्याने आरोपी सुनिल आश्रुबा कदम यास सदर गुटखा कोठुन आणला असे विचारले असता त्याने सदरचा खुटखा मैंदा (ता.बीड) येथील बाळु घुमरे याचे आखाडयावरुन श्रीधर रविंद्र ठोंबरे ऊर्फ पवन ठोंबरे याचेकडुन घेतला असल्याचे सांगितले. त्यावर पथकाने आपला मोर्चा वळवत शनिवारी दि.२१ रात्री २ वाजता मैंदा (ता.बीड) येथील बाळु घुमरे याचे आखाडयाची झडती घेतली, असता पत्राचे गोडावून मध्ये छापा मारला. त्यात राज निवास गुटख्याच्या निळसर कलसरच्या २५ मोठया गोण्या ज्याची एकुण किंमत ९५०००० रू., गोवा गुटख्याच्या पांढऱ्या कलरच्या २८ मोटया गोण्या ज्याची किंमत २२१७६०० रू., जाफराणी जर्दा च्या ५ मोठ्या गोण्या ज्याची किंमत २४०००० रू. आहे. अशी एकूण मैदा येथे ३४ लाख ७ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. माजलगाव व मैदा येथील कारवाईत ३६ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या पथकात पोलीस हवालदार अस्तीकुमार देशमुख, ढगे, नरवणे यांचा समावेश होता.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून आज दि.२१ शनिवारी सुनिल आश्रुबा कदम रा. जिजामाता नगर माजलगाव याचे राहते घरी व मैदा येथे बाळु घुमरे यांचे आखाडयावर महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही गोवा गुटखा, राज निवास विमल पानमसाला, RMD पानमसाला, हिरा पानमसाला, बाबा पानमसाला, जॉरानी जर्दा तंबाखुचा माल चोरटी विक्री करण्याचे उदेशाने जवळ बाळगतांना वरील गुटखा किंमती रु.३६ लाख २१ हजार २६७ किमतीचा माल मिळून आला. म्हणुन माझी १) सुनिल आश्रुबा कदम रा. जिजामाता नगर माजलगाव, २) श्रीधर रविंद्र ठोंबर ऊर्फ पवन ठोंबरे रा. बीड, ३) बाळु घुबरे रा. मैदा आ.क्र. ३ याने महाराष्ट्रत सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली गुटखासाठी जागा भाडयाने दिली व संगणत करुन जवळ बाळगला म्हणुन भारतीय दंड विधान कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
