केज : केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा घटना आज दुपारी घडली. या हल्ल्यातून सुदैवाने त्या बचावल्या असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज (शुक्रवारी) दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्या. दरम्यान, एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला करत बॉटलमधील पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यातून त्या बालंबाल बचावल्या असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा हल्याबाबत पोलीस तपास करत आहेत.