चित्रपट महोत्सवात माजलगावचे कलाकार चमकले !

Spread the love
  •  ‘पाखर’ लघुपट ठरला सर्वोत्कृष्ट

माजलगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला चित्रपट महोत्सव म्हणजे अजिंठा-वेरुळ चित्रपट महोत्सव होय. या महोत्सवात माजलगावचे कलाकारांनी साकारलेल्या पाखर लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलच्या आइनोक्स थेटर मध्ये दि.११ जानेवारी २०२३ ते दि.१५ जानेवारी २०२३ या कालावधीत चाललेल्या चित्रपट महोत्सवात जगभरातील विविध भाषेतील दर्जेदार चित्रपट दाखविण्यात आले. या महोत्सवात खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला, तो म्हणजे आपल्या माजलगावच्या मातीतील कलाकारांनी साकारलेला ‘पाखर’ लघुपट. या लघूपटाने सर्वांची मने जिंकून प्रेक्षक व मान्यवर परिक्षक यांना भाराऊन टाकले. या चित्रपट महोत्सवात मराठवाडा विभागातून सर्वोत्तम लघूपट म्हणून “पाखर” या लघूपटाला “द सिलवर कैलास ॲवार्ड” मिळाला. या पुरस्काराचे स्वरुप २५,००० रु.रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. या महोत्सवाला किशोर कदम, चंद्रकांत कुलकर्णी, निखिल महाजन, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, प्रतिमा जोशी, उमेश कामत, पुष्कर जोग, जितेंद्र जोशी, श्वेता बसु प्रसाद, अशोक राणे, ज्ञानेश झोटींग इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली होती.
पायपीट फिल्म्स प्रस्तूत ‘पाखर’ या लघूपटाचे दिग्दर्शन ॲड.सतिष धुताडमल तर निर्मिती आर.प्रकाश यांनी केली आहे. या लघूपटाचे लेखन व कला दिग्दर्शन रंगा अडागळे यांचे असुन स्थिर छाया चित्रण अमर देवणे यांनी केले आहे. तर मयुर भिसे, सौरभ धापसे, बळीराम गायकवाड, सावन राठोड, यश धुताडमल यांनी मोलाचे सहाय्य केले. “पाखर” लघूपट हा ऊसतोड कामगारांच्या लहान मुला-मुलींच्या भावविश्वावर आधारीत असल्याचे पायपीट फिल्म्स् चे व्यवस्थापक विष्णू उगले यांनी सांगितले. ‘लच्छी’ या लघूपटाच्या यशापाठोपाठ ‘ पाखर’ हा प्रयोगाशील लघूपटही यशस्वी होत असल्यामुळे ‘पायपीट फिल्म्स्’ च्या टिमचे सर्व स्तरातून कौतुक होत आसल्याचे पाहावयास मिळत आहे.

Leave a Reply