राज्यात होणार २० हजार अंगणवाडी सेविकांची
महीलासाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारकडून 26 जानेवारी पासून 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकेसाठी यापूर्वी असलेली दहावी उत्तीर्ण ची अट आता बारावी उत्तीर्ण करण्यात आली आहे.
अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. तसेच ३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी (मे २०२३ पूर्वी) अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.