प्रदिपदादा सोळंकेची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळंके यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात पक्ष विरोधी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यातून सोळंके यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याने आज प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी केल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात श्री. विक्रम वसंतराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून अधिकृतरीत्या उमेदवारी देऊन “AA” व “BB” फॉर्म ही त्यांनी भरून ते पार्टीचे उमेदवार घोषित झालेले आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अर्ज भरून आज दि. १६/१/२०२३ या शेवटच्या दिवशी त्यांना कळवूनही अर्ज मागे घेतला नाही. यामुळे सोळंके यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत आज दि.१६ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply