माजलगावात ‘चाय पे चर्चा ‘ वर पार पडला विवाह !

Spread the love

माजलगाव : विवाह म्हंटले की हुंडा, संसार उपयोगी साहित्य, कपडे, जेवणावळ ह्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो. याला अपवाद ठरवत शहरातील आझाद नगर येथील समशेर पठाण यांनी त्यांच्या मुलाचा विवाह केवळ चहा वर लावला. यामुळे वर – वधू पित्यांचे अनावश्यक खर्च वाचला असून त्यांच्या या निर्णयाचे शहरात स्वागत करत आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आझाद नगर येथील समशेर पठाण यांचा मुलगा अरबाज पठाण व इंदिरा नगर येथील युसूफ शेख यांची मुलगी बुशरा यांचा विवाह जमवण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मुलाचे वडील समशेर पठाण यांनी हुंडा, संसार उपयोगी साहित्य, कपडे, जेवणावळ ह्या गोष्टी न करता साध्या पद्धतीने करण्याचा भूमिका मुलीचे वडील युसूफ शेख यांच्यापुढे मांडला. त्यांनी त्यास होकार दिला. ठरल्याप्रमाणे आज (दि.१५) शहरातील मदिना मस्जिद येथे हा विवाह mim चे जिल्हाध्यक्ष ऍड. शेख शफीक, माजी नगराध्यक्ष शेख मंजुर, mim चे तालुकाध्यक्ष इद्रिस शेख, आसिफ शेख, राम गायकवाड, सुशांत पौळ, अशोक लांडगे, रुपचंद कांबळे, राजु कुरेशी, सोहेल आत्तार, राज गायकवाड, सलीम शेख आदींनी उपस्थित राहून शुभेछा दिल्या.

Leave a Reply