जयसिंग सोळंके यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Spread the love

माजलगाव : बीड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा अचानक जयसिंग सोळंके यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याकडे दिला आहे. सोळंके यांच्या अचानक राजीनाम्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मागील दोन तीन महिन्यापासून सोळंके कुटुंब पक्षावर नाराज असल्याचे चर्चेत होते. आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाने ज्येष्ठ सदस्य असताना ही मंत्री पदाची संधी दिली नाही. तसेच नुकत्याच साखर संघाच्या अध्यक्षपदी आ.सोळंके यांची वर्णी लावण्यात येणार होती, मात्र तिथे पक्षाने उपाध्यक्ष पदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. चार पाच दिवसापूर्वी शिक्षक आमदार निवडणूक संदर्भात बैठकीस ही आ.सोळंके सक्रिय दिसले नाही. तर आज अचानक शनिवार दि.१४ जयसिंग सोळंके यांनी एकाएकी पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याकडे दिला. यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे.

जाहिरात …

Leave a Reply