🏆 सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून श्री मंगलनाथ मल्टिस्टेट सन्मानित
फेडरेशन ऑफ मल्टीस्टेंट लि. पुणे द्वारे सहकार गौरव सोहळा शिर्डी येथे दि.१३ जानेवारीला पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे होते तर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती तथा NCUI चे संचालक उदय जोशी, रिझर्व्ह बँक इंडियाचे संचालक सतीश मराठे, बुलढाणा अर्बनचे CMD डॉ.सुकेश झंवर, फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांची उपस्थिती होती.

श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ला २०० ते ५०० कोटी ठेवी गटातील प्रथम क्रमांक मिळवत सर्वोत्कृष्ट्ट संस्था पुरस्कार २०२२ प्राप्त केला. NCUI चे संचालक उदय जोशी यांच्या हस्ते संस्थेचे प्रतिनिधी व्यवस्थापकीय संचालक ॲड.रवींद्र कानडे, अधिकारी सचिन कैलासे, राहुल काटकर व अमोल पांडे यांना प्रदान केला.
🛣️ परभणी ते दादर बौद्ध धम्म पदयात्रेत सहभागी व्हा – दत्ता कांबळे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली ११० बौद्ध भंते यांच्या उपस्थितीत परभणी ते दादर बौध्द धम्म पदयात्रेचे दि.१७ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. या
पदयात्रेस परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड परभणी येथून सकाळी ११.३० सुरुवात होणार आहे.

या पदयात्रेत जिल्ह्यातील बौद्ध उपासक व आंबेडकरी अनुयायी तसेच विविध समविचारी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे केले आहे.
🩸 शिवधर्म प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घघाटन भाजप नेते रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, शहराध्यक्ष सुरेश दळवे, मा.नगराध्यक्ष डॉ.अशोक तिडके, बाळासाहेब क्षिरसागर, राहुल चिरके, रवी कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम शिंदे, उपाध्यक्ष गजानन फुके, सचिव उदय जोशी, दीपक तोडकरी ,नागेश शेजुळ, दीपक कुंभार, बाळासाहेब थोरात, बालू फाटे, अमोल पवार, सुनील दळवे आदींनी पुढाकार घेतला.
🥇 हर्षवर्धन खांडेकरने पटकावला. ‘विद्यार्थी वक्ता’ पुरस्कार

माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित डॉ हेडगेवार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक चि.हर्षवर्धन बंडूजी खांडेकर (श्री सिध्देश्वर विद्यालय, माजलगाव) याने पटकावत विद्यार्थी वक्ता पुरस्कार प्राप्त केला.
तर द्वितीय – अष्टपुत्रे मल्हार गणेश ( श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई ) , तृतीय – चि. शेंडगे अजिंक्य रत्नेश्वर (महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, माजलगाव) , उत्तेजनार्थ – कु. मुंडे प्रतिक्षा विठ्ठल ( न्यू हायस्कूल कारी) यांनी मिळवला.
