बीड LCB ची कारवाई
बीड : स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मंगळवारी पहाटे ४ वा. बीड – गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी येथे बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या पार जिल्ह्यातील तरुणाला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
बीड-गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी जवळील उड्डाण पुलाखाली एक तरुण संशयास्पद पने थांबला असून कमरेला पिस्तुल आहे. अशी माहिती मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सूत्रांच्या मार्फत LCB ला माहिती मिळाली. त्यावर तात्काळ LCB अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव सदरील तरुणाचा हालचाली संशयास्पद दिसताच, चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यास मोठ्या शिताफीने पकडत त्याच्याजवळील गावठी पिस्तूल (किंमत ३७ हजार) मिळून आले. त्यास नाव गाव विचारले असता त्याने जुबेर शफीक आतार (वय २७ वर्ष) रा. जयभवानी चौक पाथर्डी ( ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) असे सांगितले. आरोपीस गेवराई पोलीसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ( LCB ) ने केली.