माजलगाव : केसापूरी शिवारातील गट क्र.11 मध्ये अस्तित्वात नसलेला प्लॉट बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत करून देत महिलेने एका कोतवालाची १ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
केरबा बाबुराव तपसे (वय 27 वर्षे) व्यवसाय कोतवाल रा. सोन्नाथडी ता. माजलगांव जि. बीड यांना दि.23/07/2021 रोजी मौजे केसापुरी शिवारातील शेत गट क्रमांक 11 मधील राजश्री राहुल पवार रा. तिसंगी ता. पंढरपुर जि. सोलापुर यांचे नावे असलेला प्लॉट क्रमांक 42 ज्याचे क्षेत्रफळ 111.52 चौ.मी.ज्याची चतुर्सिमा पुर्वेस 20 फुटाचा रस्ता, पश्चिमेस प्लॉट क्रमांक 43, दक्षिणेस प्लॉट क्रमांक 41,उत्तरेस 25 फुटाचा रस्ता अशा चतुर्सिमेचा प्लॉट सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय-2 माजलगांव येथे द.अ.क्र.3654/2021 दि. 23/07/2021 अन्वये 1,82,000/- रुपयामध्ये खरेदी केला. नमुद खरेदी खतामध्ये साक्षीदार 1) दत्ता नामदेव घाटुळ रा. रोषनपुरी ता. माजलगांव 2) मुरलीधर विठ्ठलराव चव्हाण रा. काडी वडगांव क्र-2 माजलगांव यांच्यासमक्ष रजिस्ट्री करुन घेतला सदर प्लॉटची रजिस्ट्री झाल्यानंतर राजश्री राहुल पवार यांनी मला प्लॉट जागी नेवुन प्लाट दाखवला. त्यानंतर मी नमुद प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी बोअर घेवुन बांधकामाचे साहीत्य आणुन टाकले प्लॉट रजिस्ट्री होवुन एक महीना झाल्यानंतर रामराव दामु चव्हाण रा. जाधववाडी चिखली बुद्रुक ता. जि. पुणे हे सदर प्लॉटवर आले व त्यांनी सदरचा प्लॉट क्रमांक 42 त्यांचे मालकीचा असल्याचे सांगुन सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय-2 माजलगांव येथील द. अ. क्रमांक 179/2019 दि. 21/01/2019 दाखवला, तो त्यांचे नावे असल्याचे मी पाहीले. त्यानंतर मी नमुद प्लॉटबाबत तहसिल कार्यालय माजलगांव येथे जावुन मला राजश्री राहुल पवार यांनी दिलेले कागदपत्र एन ए व त्यासाठी लागणारे चलन, नाहारकत प्रमाणपत्र,नकाशा बाबत चौकशी केली असता, नमुद कागदपत्रांची तहसिल कार्यालय माजलगांव येथे कसल्याही प्रकारची नोंद नसल्याचे मला आढळुन आले. त्यानंतर माझी फसवणुक झाल्याचे माझ्या लक्षात आल्याने मी राजश्री राहुल पवार यांना वारंवार फोन करुन तसेच त्यांचेकडे जावुन माझी फसवणुक केल्याबाबत विचारणा केली. त्यांनी मला तुमचे पैसे तुम्हाला परत देणार असल्याचे सांगुन टाळाटाळ करुन पैसे परत दिले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने कोतवाल केरबा तपसे यांच्या फिर्यादीवरून प्लॉट नसतानाही असल्याचे सांगून बनावट कागदपत्र तयार करुन नमुद प्लॉट माझ्या मालकी हक्कात लिहुन देवुन फसवणूक केल्या प्रकरणी राजश्री राहुल पवार (रा. तिसंगी ता.पंढरपुर जि. सोलापुर) विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार माधव तोटेवाड हे करत आहेत.