माजलगावात सर्व धर्मीय विवाह सोहळा; नाव नोंदणी करण्याचे अध्यक्ष बाळु ताकट यांचे आवाहन

Spread the love

माजलगाव : शिव जन्मोत्सव समितीकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धर्मीय विवाह सोहळा पार पडणार आहे. गरजवंतानी या विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकट यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट यांच्या वडिलांचे मागील वर्षी अकाली निधन झाले होते, तसेच ऐन कार्यक्रमा दरम्यान दोन भाच्यांचे अपघाती निधनामुळे दुःखाचा डोंगर कुटुंबावर कोसळला होता. त्यामुळे एक वर्ष कार्यक्रम खंडित झाला. परंतु समाजाप्रती आपले देणे आणि संस्थेमार्फत गरीब कुटुंबाला या विवाह सोहळ्यातून लागणारा हातभार ही जाणीव सतत होती. त्यामुळे दुख: पचवत पुन्हा सर्वधर्मीय विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. यावर्षी शिव जन्मोत्सवा निमित्त आयोजित या कार्यक्रमात शंभर लोकांचे ढोल पथक, २२ फुटी हनुमान देखावा, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई देखावा. अनेक बँड पथक, हलकी पथक, नगारा वादन, भगवा झेंडा पथक यासह चित्त थरारक प्रात्यक्षिकेसह अनेक देखावे मिरवणुकीत सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या शिवजन्मोत्सवा निमित्तच्या विवाह सोहळ्यात पात्र वधू-वरांची नाव नोंदणी करवी, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकट यांच्यासह प्रशांत होके, राहुल मुगदिया, बल्ली(विष्णु)होके, प्रसाद सावंत, सचिन सुरवसे यांनी केले आहे.

  • दात्याचा सन्मान अन् यावर्षी स्वखर्चातून उत्सव होणार

गत अनेक कार्यक्रमात परिसरातील दात्यांनी संस्थेला वर्गणी देऊन आयोजित कार्यक्रमाला हातभार लावला होता. हे ऋण संस्थेच्या मनात कायम असून यावर्षी संस्था स्वबळावर हा कार्यक्रम पार पाडणार आहे. त्यामुळे दात्यांच्या वर्गणी शिवाय यावर्षी शिवजन्मोत्सव समिती विवाह सोहळे घेणार आहे. संस्थेला अनेक वर्षापासून वर्गणीच्या स्वरूपात विवाह सोहळ्यांसाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचा कार्यक्रम स्थळी योग्य सन्मान करणार आहे.

Leave a Reply