मुलगी बघा म्हणून लग्नाळू शेतकरी पुत्राचा आमदाराला फोन !

Spread the love

मुली मिळत नसल्याने लग्नाळू तरुणांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महिना झाला नाही, तोच एका शेतकरी पुत्राने थेट आमदाराला फोन करून लग्नासाठी तुमच्या मतदार संघात मुलगी बघा म्हणून गळ घातली आहे. आमदार व तरुणातील संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असल्याने सामाजिक प्रश्न समोर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना खुलताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला. घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेती देखील आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुखः व्यक्त केलं. तर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना अशी मागणी केली. यावर राजपूत यांनी देखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन देत तरुणाला विश्वास दिला.

असे झाले संभाषण …

तरुण: हॅलो, साहेब जय महाराष्ट्र

आमदार राजपूत: जय महाराष्ट्र

तरुण: रत्नपूरमधून बोलतोय साहेब, विजय होळकर… ग्रामीण मधून

आमदार राजपूत: बोला, बोला, भाऊ, बोला

तरुण: काय निवांत होते का? साहेब

आमदार राजपूत: नाही. थोडंसं बसलेलो आहे…बोला बोला

तरुण: साहेब असा विषय होता, घरी चांगलं आहे आपल्या, एवढी काही वाईट परिस्थिती नाही, आठ-नऊ एकर जमीन आहे.

आमदार राजपूत: हा..हा..हा

तरुण: पण साहेब इकडे कोणी मुलगी द्यायला तयारच नाही साहेब

आमदार राजपूत: कुठे..कुठे

तरुण: आपला रत्नापूर…म्हणजेच खुलताबाद भद्रा मारुती…

आमदार राजपूत: तुमचा बायोडेटा पाठवून द्या

तरुण: बायोडेटा म्हणजे… आपण रत्नापूरपासून खाली फुलंब्री रोडवरून खाली 6 किलोमीटर गाव आहे.

आमदार राजपूत: बायोडेटा, बायोडेटा पाठवून द्या

तरुण: परिस्थिती चांगली आहे साहेब, पण…

आमदार राजपूत: बायोडेटा पाठवून द्या

तरुण: विकास भाऊच्या याच्यावर पाठवू का?

आमदार राजपूत: हा..पाठवून द्या..पाठवून द्या

तरुण: विकास भाऊचा नंबर आहे माझ्याकडे, तुमचा व्हाट्सअप नंबर हाच आहे का?

आमदार राजपूत: हा..पाठवून द्या पाठवून द्या..

तरुण: तुमच्या कन्नड सर्कलमध्ये देखील भरपूर मुली आहेत साहेब..

आमदार राजपूत: बरं..बरं बोलतो….

Leave a Reply