माजलगाव : लोकनेते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कै. सुंदरराव सोळंके साहेब यांच्या प्रित्यर्थ कायम त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा. याकरिता मोहखेड ग्रामस्थांनी गावच्या सुरुवातीसच प्रवेशद्वार उभारले आहे. या प्रवेशद्वाराचे उद्या दि.१० मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
याप्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार प्रकाश सोळंके, सौ.मंगलताई सोळंके, धैर्यशील सोळंके, सौ.उज्वलाकाकी सोळंके, विरेंद्र सोळंके, सौ.पल्लवीताई सोळंके, जयसिंग सोळंके, सौ. ऐश्र्वर्याताई सोळंके यांच्या हस्ते होणार आहे. तर माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, भारत जगताप, सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष पिंटूसेट रुद्रवार यांची उपस्थिती राहणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन मोहखेड ग्रामस्थांनी केले आहे.