माजलगाव नगर परिषदेची राज्यस्तरीय चौकशीचे आदेश

Spread the love
  • तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले अडचणीत

माजलगाव : माजलगाव नगर परिषद कायम वादग्रस्त ठरत असून पुन्हा एकदा आत्ता मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराची राज्यस्तरीय चौकशीचे आदेश २९ डिसेंबर २०२२ रोजी धडकले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी भोसले यांच्या कार्यकाळात ६५ कोटीच्या कामात भ्रष्टाचार असल्याच्या ९ तक्रारीवरून ही चौकशी लागली आहे.

माजलगाव येथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे शासनस्तरावर माजलगाव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या विविध तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासकीय कारवाई शासनस्तरावर प्रस्तावित करण्यापूर्वी, सर्व तक्रारीच्या अनुषंगाने तसेच, इतर अन्य प्रकरणी केलेल्या अनियमिततांची शक्यता पाहता भोसले हे मुख्याधिकारी, माजलगांव नगरपरिषद या पदावर कार्यरत असतानाच्या संपूर्ण कार्यकाळाची वस्तुस्थितीदर्शक निष्पक्ष चौकशी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या कार्यालयामार्फत करुन, उक्त चौकशी समितीचा चौकशी अहवाल शासनास तातडीने सादर करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रीतमकुमार जावळे यांनी नगर परिषद प्रशासन संचानालयास दिले आहेत.

Leave a Reply