- परभणीत शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने दिली 60 एकर जागा
येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे. येथिल मुस्लिम बांधवाने शिवपुराण कथेसाठी ६० एक्कर जागा दिली आहे. त्यांच्या 15 एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवून ही जागा उपलब्ध करून दिली आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे.

“जगात जर्मनी अन् भारतात परभणी”अशी म्हण परभणीबाबत म्हंटले जाते. इथल्या माणसांमध्ये कुणालाही आपलेसे करण्याची परंपरा आहे. इथे सर्वच समाज बांधव सर्वधर्म समभावाने वागतात. परभणीत आठ डिसेंबरला मुस्लिम समाजाचा इजतेमा पार पडला. तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव येथे आले होते. धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी इथे हिंदू बांधव मदतीला आहे. इजतेमासाठी हिंदूंची जमीन देण्यात आली. तर आत्ता शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे शिवपुराण आयोजित केले आहे. यासाठी परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी आपली 60 एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली आहे. एवढेच काय तर 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकर वर लावलेल्या हरभऱ्यावर त्यांनी नांगर फिरवत जागा उपलब्ध करून दिली आहे. आता या ठिकाणी शिवपूराण कथा होणार आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक याठिकाणी पाहायला मिळाले आहे.
