जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दि.४ जानेवारी २०२३ रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. माजलगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना होणार आहेत.
माजलगाव तालुक्यातील लोनगाव, लऊळ, खतगव्हाण, साळेगाव, सरवर पिंपळगाव, निपाणी टाकली, वारोळा, तालखेड, सावरगाव, हारकी निमगाव, सांडस चिंचोली, केसापुरी, शेलापुरी, मंगरूळ, पुरुषोत्तमपुरी, मंजरथ, टालेवाडी, सिमरी पारगाव, महातपुरी, रिधोरी, भाटवडगाव, लुखेगाव, वांगी, शिंदेवाडी वांगी, टाकरवन, काळेगावथडी, डब्बा मजरा, तेलगाव खु., खानापुर, उमरी बु., चींचगव्हण, फुले पिंपळगाव, सोमठाणा, छोटेवाडी या ३४ गावच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाळ संपला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात पार पडणार असल्याने निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर होऊ शकतो. त्यामुळे आत्ता प्रभाग रचनेकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागून आहे.