नौकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी आनंदाची बातमी असून सेंट्रल रेल्वेने 2422 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. https://rrccr.com/Home/Home या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सेंट्रल रेल्वेमध्ये अपरेंटिस पदाच्या 2422 जागांची भरती होणार असून शैक्षणिक पात्रता 10 वी पास आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तर उमेदवाराचे वय 24 वर्षांच्या आत असावे.
- अर्ज फी :Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 100/-
- निवड प्रक्रिया :
- या सरकारी नोकरीमध्ये, मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवाराची निवड कामगिरीनुसार केली जाईल.
