या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे अवघे या ..! 

Spread the love

छत्रपती संभाजी राजेंच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शंभूभक्तांना रायगडावर येण्याचे आवाहन

छत्रपती संभाजी राजांचा 342 वा राज्याभिषेक सोहळा येत्या 16 जानेवारीला रायगडावर आयोजित केला जाणार असून या सोहळ्याला शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीने केले आहे.

2015 सालापासून सोहळा समितीच्या वतीने सोहळ्याची सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या 8 वर्षात सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून यंदा मर्दानी राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मललविद्येचा घालून दिलेला शिरस्ता पुढे छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी, छत्रपती थोरले शाहू, राजर्षी शाहू यांनी मोठ्या दिमाखात सुरू ठेवला. महाराजांकडून राजाश्रय मिळालेल्या या मर्दानी खेळात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. त्या पैलवानांच्या हस्तेच यावर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शिवशंभू पाईकांनी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply