-
आयपीएस डॉ. बी. धीरज कुमार यांच्या पथकाची कारवाई
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण येथे अवैध दारू विक्री साठी आणली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून आयपीएस डॉ. बी. धीरज कुमार यांच्या पथकाने शनिवारी सापळा रचत २४ हजार रुपयांची अवैध देशी दारू पकडली. मात्र यावेळी आरोपींनी पळून जाण्यात यशस्वी झाले, याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयपीएस डॉ. बी. धीरज कुमार यांच्या पथकाला शनिवारी टाकरवण कडुन सचिन पटटेकर रा. टाकरवण व एक इसम मोटार सायकलवर देशीदारूचे बॉक्स घेवुन टाकरवण फाटयाकडे येत आहेत. त्या अनुशंघाने टाकरवण फाटयाकडुन टाकरवणकडे जात असताना १२ वाजता समोरुन एक मोटार सायकल आली. त्यावर दोन इसम असुन दोघांचे आत पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये बॉक्स ठेवलेले दिसुन आले. पोलिसांना गणवेशात पाहून मोटार सायकल जोरात पळविली. त्यावर पोलिसांनी पाठलाग केला असता मोटार सायकल चालक याने रोडच्याकडीला गाडी थांबुन गाडीवरील बॉक्स हे प्रज्ञा हॉटेलचे समोर ठेवुन ते मोटार सायकल वर बसुन पळुन गेले. याव पळुन गेलेल्या इसमाच्या नावाची खात्री करिता सचिन सुंदर पटटेकर व भाग्योदय ऊर्फ गोटया मुरलीधर पटटेकर दोन्ही रा. टाकरवण असे असल्याचे समजले.
याप्रकरणी अवैध देशी दारूच्या विक्री करत असल्या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन सुंदर पटटेकर व भाग्योदय ऊर्फ गोटया मुरलीधर पटटेकर दोन्ही रा. टाकरवण ता. माजलगाव यांच्या विरुद्ध पोलीस हवालदार रवी शंकरराव राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.