माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांची मागणी
माजलगाव : माजलगाव नगर परिषदमध्ये शहरातील ४८४ घरकुल धारकाचा घरकुल मजुर झाले आहे. या घरकुल धारकास बांधकाम परवानगी काढणे आवश्यक असते त्या नुसार अनेक नागरीक न.प. कर भरण्या करीता येत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांकडून अवाच्या सव्वा कराची आकारणी होत आहे. ही तात्काळ थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासक अविनाश निळेकर यांच्याकडे माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी गुरुवारी केली आहे.

ऑनलाईन कराची आकारणी केलेली पावती सोबत घेऊन नागरिक नगर परिषद कार्यालयात येत आहेत. परंतु कर्मचारी हे या कराची आकारणीच्या पावतीनुसार कर भरुन न घेता. संबंधीत नागरीकांना तुमचे मागील बाकी सात हजार, बारा हजार आहे. परंतु ही मागील बाकी सांगत मागील वर्षाचा कर थक बाकी आहे. या बाबत कोणताही रेकॉर्ड न बगता अंदाजीत रक्कम सांगत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नागरीकांना अनेक अडचणी येत आहे. ह्यातून एक प्रकारे नागरीकांची बेकायदा आर्थीक लुट होत आहे. या सर्व नागरीकांनची अडवणुक थांबवावी व न.प. ने एजन्सी कडुन कर आकारण संबंधीत कर मालमत्तेची लावलेला आहे, तो कर घेण्यात यावा. नागरीकांकडुन मागील तुमच्या कडे ५ ते १० वर्षाचा कर बाकी आहे. असे सांगु नये जर मागील ५ ते १० वर्षाचा कर नागरीका कडे आहे न.प. कार्यालय मध्ये या बाबतीत रेकॉर्ड दाखवावा. शहरातील नागरीकांना कराच्या बाबतीत वेठीस धरू नये, अन्यथा न.प. प्रशासन विरोधात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी दिला आहे.
