आ.धनंजय मुंडेच्या वाहनाला अपघात;मात्र सर्व सुखरूप

Spread the love

माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. सुदैवाने कुणाला मोठी दुखापत नसून सर्व जन सुखरूप आहेत.

धनंजय मुंडे मंगळवारी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते. मध्यरात्री १३:३० च्या सुमारास त्यांच्या चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात किरकोळ मार लागला असून आपल्या तब्बेतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे स्वतः धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply