माजलगाव झटपट बातम्या ..
- चिंचगव्हाण येथे शोले स्टाईल आंदोलन

चिंचगव्हाण येथे सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.३) ग्रामस्थांचे शोले स्टाईल पाणी पुरवठ्याच्या जलकुंभावर चडून आंदोलन. आठवडा भरात शुद्ध व सुरळीत पाणी पुरवठा, स्वच्छतेची कामे करण्याचे आश्वासना नंतर आंदोलन मागे.
- शिक्षकांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध

जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम वर्ग -२ पदाच्या पदोन्नती पासून वंचित ठेवणाऱ्या 28 डिसेंबर 2022 रोजीच्या काढलेल्या शासन अधिसूचनेचा माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.
- जयसिंगभैय्या सोळंके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

जयसिंग भैय्या सोळंके यांच्या वाढदिवसाचे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने पत्रकार रामेश्वर गोंडे यांच्या पुढाकाराने वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन, पेन्सिल, खोडरबल, शॉपनर आदी शालेय साहीत्यांचे वाटप करण्यात आला.
- डॉ. राजकुमार राठोड यांची पुरस्कारासाठी निवड

माजलगाव: माजलगाव, जिल्हा बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लऊळ क्र.१ येथील प्राथमिक शिक्षक, यशदाचे तज्ञ मार्गदर्शक, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षक, संशोधक डॉ. राजकुमार तुकाराम राठोड यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२१-२२ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित झाला आहे.
