किट्टी आडगाव येथे घरफोडी; सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास

Spread the love

माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथील घराचे चॅनल गेट तोडून घरात प्रवेश करत ३ ग्राम सोने, नगदी ५० हजार असा सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील किट्टी आडगाव येथील लखन भागवत खेत्रे हे रोजच्या प्रमाणे दि.१ रोजी रात्री घरी झोपले होते. या दरम्यान रविवारी पहाटे दरम्यान घराचे चॅनल गेटचे कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, प्रति ग्रॅम तीन हजार रुपये प्रमाणे ७५,००० रुपयाचे व नगदी ५०,००० रुपये असा एकुण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी लखन भागवत खेत्रे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करत आहेत.

Leave a Reply