‘ या ‘ ३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज !

Spread the love

माजलगाव : दि.१ जानेवारी २०२३ ते दि.७ जानेवारी २०२३ दरम्यानच्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ होत आहे. त्या ठिकाणी आत्ता प्रशासक राज आले आहे. या गावातील गाव पुढाऱ्यांना निवडणुका केव्हा जाहीर होणार यांची उत्सुकता लागली आहे.

माजलगाव तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात नुकत्याच मागील महिन्यात पार पडल्या. जनतेतून सरपंच असल्याने मोठ्या चुरशी गावागावात पाहायला मिळाल्या. आत्ता तालुक्यात दुसऱ्या टप्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी या ३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज मात्र आले आहे.

कोणत्या गावात कोण प्रशासक ?

  1. लोनगाव – प्रशासक पंडित के. डी.,
  2. लऊळ – प्रशासक पंडित के. डी.,
  3. खतगव्हाण – प्रशासक काळे ए.जी.,
  4. साळेगाव – प्रशासक काळे ए.जी.,
  5. सरवर पिंपळगाव – प्रशासक धोंडगे व्ही.बी.,
  6. निपाणी टाकली – प्रशासक धोंडगे व्ही.बी.,
  7. वारोळा – प्रशासक गडपाले डी. एल.,
  8. तालखेड – प्रशासक गडपाले डी. एल.,
  9. सावरगाव – प्रशासक कुपेवार व्ही. डी.,
  10. हारकी निमगाव – प्रशासक कुपेवार व्ही. डी.,
  11. सांडस चिंचोली – प्रशासक सुरवसे एस.डी.,
  12. केसापुरी प्रशासक – सुरवसे एस. डी.,
  13. शेलापुरी – प्रशासक कापसे पी.पी.,
  14. मंगरूळ – प्रशासक कापसे पी.पी.,
  15. पुरुषोत्तमपुरी – प्रशासक केसोड वाय. एस.,
  16. मंजरथ – प्रशासक केसोड वाय. एस.,
  17. टालेवाडी – प्रशासक कातखडे एस.जी.,
  18. सिमरी पारगाव – प्रशासक कातखडे एस.जी.,
  19. महातपुरी – प्रशासक किर्व ए.बी.,
  20. रिधोरी – प्रशासक किर्व ए.बी.,
  21. भाटवडगाव – प्रशासक महामुनी आर. व्ही.,
  22. लुखेगाव – प्रशासक महामुनी आर. व्ही.,
  23. वांगी बु. – प्रशासक श्रीमती रत्नपारखी व्ही.जी.,
  24. शिंदेवाडी वांगी – प्रशासक श्रीमती रत्नपारखी व्ही.जी.,
  25. टाकरवन – प्रशासक घनघाव आर.आर.,
  26. काळेगावथडी – प्रशासक घनघाव आर.आर.,
  27. डब्बा मजरा – प्रशासक श्रीमती कुरुळे जे. व्ही.,
  28. तेलगाव खु. – प्रशासक श्रीमती कुरुळे जे. व्ही.,
  29. खानापुर – प्रशासक श्रीमती करंजकर एस.जे.,
  30. उमरी बु. प्रशासक श्रीमती करंजकर एस.जे.,
  31. चींचगव्हण – प्रशासक राऊतमारे जे.बी.,
  32. फुले पिंपळगाव – प्रशासक राऊतमारे जे.बी.,
  33. सोमठाणा – प्रशासक काळे बी.यू.,
  34. छोटेवाडी – काळे बी.यू.

हे अधिकारी वरील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त केले आहेत.

Leave a Reply