माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथील एका २७ वर्षीय महिलेवर घरात रात्री घरात घुसून बळजबरीने बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि.१) रात्री १ वाजता घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पात्रुड येथे महिला आपल्या मुलासह दि.३१ डिसेंबर रोजी घरात झोपली होती. यादरम्यान रात्री १ वाजता (दि.१ जानेवारी) अचानक घराचा दरवाजा वाजवला, यावर महिलेने कोण आले हे पाहण्यासाठी दरवाजा उघडला. यावर ताहेर हा जबरदस्तीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून रूममध्ये ओढत नेऊन गेला. यावेळी महिलेच्या गालावर बोचकुरे ओढत बळजबरीने बलात्कार केला. आरडा ओरडा केलाच तर तुझ्या लेकरांना जीव मारील असे धमकावत अत्याचार केला. यावेळी आवाजाने घरातील मुले उठली असता त्यांच्या ओरडण्याचा आवाजाने शेजारील नागरिक धावले. यावर ताहेर शेख हा तेथून पळून गेला.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ताहेर शेख यांच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंक मोबाईल पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या करत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे.