माजलगाव, दि.२: माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार हा मागील सहा – सात महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यावर चालत होता. मात्र आज (दि.२) माजलगाव ग्रामीण ठाण्यास ठाणेप्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक बालक कोळी हे रात्री ८ वाजता रुजू झाले आहेत.
पोलीस निरीक्षक बालक कोळी यांनी पदभार स्वीकारला असता सत्कार करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, निलेश इधाटे, विजयसिंह जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक बोडके, दाभाडे, पोलीस जमादार यशवंत आदी.
पोलीस निरीक्षक बालक कोळी हे औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांची बीड पोलीस दलात औरंगाबाद येथून बदली झाली. दोन आठवड्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार कोळी यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर त्यांनी तात्काळ आज (दि.२) रात्री ८ वाजता माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर होत पदभार स्वीकारला असून रुजू झाले आहेत.