धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी मंगेश तोंडे

Spread the love

किल्ले धारूर : धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापतीपदी सुनिल शिनगारे यांची सोमवारी (आज) बिनविरोध निवड करण्यात आली. अवघ्या २४ व्या वर्षी मंगेश तोंडे यांना सभापती होण्याचा मान मिळाला असून जिल्ह्यात सर्वात तरुण सभापती ठरले आहेत.


भाजपा नेते रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे व माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या व्यूहरचनेमुळे धारूरची कृषी उत्पन्न बाजार समिती एकहाती ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. 18 पैकी 17 संचालक निवडून आणत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. आज (सोमवारी) सभापती व उपसभापती करिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सभापतीपदा करिता मंगेश महादेव तोंडे तर उपसभापदा करिता सुनील भैरवनाथ शिनगारे यांचेच अर्ज आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. मंगेश तोंडे यांच्या रूपात प्रथमच २४ वर्षीय तरुण सभापती लाभला आहे.

Leave a Reply