माजलगाव शहरालगतच्या गावातील ‘ते’ बेकायदेशीर प्लॉट अखेर रद्द ?

Spread the love

माजलगाव शहराच्या मंजरथ रोड लगत असलेल्या काडीवडगांव क्र.2 (ता. वडवणी जि.बीड) येथील सर्व्हे नं.74 शिवार भाटवडगांव ओपन स्पेसच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या तयार केलेले प्लॉट न.55 ते 62 हे अखेर गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्याचा आदेश देण्यात आला.

काडीवडगांव हे गाव माजलगांव धरणाखाली गेल्यामुळे त्या गावचे पुर्नवसन झाले आहे व त्या गावचे पुर्नवसन हे काडीवडगांव नं. 1 व काडीवडगांव नं.2 म्हणुन माजलगांवच्या जवळ भाटवडगांव शिवारामध्ये सर्व्हे नं.73 व 74 मध्ये झाले. त्या गावाला पुर्वी तालुका हा माजलगांव होता परंतु वडवणी तालुका निर्मिती झाल्यामुळे काडीवडगांव नं.1 हे गाव वडवणी तालुक्यामध्ये गेले व त्या सोबतच काडीवडगांव नं.2 हे ही महसुलदृष्टी वडवणी तालुक्यात गेले. काडीवडगांव नं.2 मधील सर्व्हे नं.74 मध्ये शासनाने 54 लोकांना भुखंड वितरीत केलेले होते व त्यानुसार लेआऊट देखील 54 लोकांच्या भुखंडाचा होता. असे असतांनाही काडीवडगांव येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी इतर काही दोन – चार लोकांना व ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना हाताखाली धरुन काडीवडगांव नं. 2 च्या सर्व्हे नं.74 मधील ओपन स्पेसच्या जागेवर प्लॉट नं.54 नंतर बेकायदेशीररित्या प्लॉट तसेच नमुना नं. 8 च्या रजिस्टरला देखील 54 नंतर गेली 30 ते 35 वर्षे वाढवुन एकही नाव नसतांना पुढे नमुना नं. 8 ला बेकायदेशीररित्या नावे वाढवुन खोटया स्वरुपाच्या पि.टी.आर/नमुना नंबर 8 च्या नक्कला तयार केल्या. तसेच नाहरकत खरेदी विक्रीचा व्यवहार चालु केलेला होता. त्यामध्ये एक बेकायदेशीररित्या प्लॉटचे खरेदीखतही करण्यात आले होते. या सर्व गोष्टीची माहीती काडीवडगांव येथील गावकरी मंडळी यांना माहीती होताच गावकरी मंडळी यांनी आमदार प्रकाश सोळंके यांचेकडे सदरील गोष्टीबाबतचा पाठपुरावा केला. त्यांनी सदरील बेकायदेशीर गोष्टीसाठी शासनासोबत पत्र व्यवहार करुन संबंधीतावर कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला व सदरच्या गोष्टीची सुनावणी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड यांचेसमोर प्रथमतः चालली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधीत वडवणी पंचायतीचे गटविकास अधिकारी यांना आदेश देवून तातडीने संबंधीत गोष्टीची सुनावणी घेण्यासाठी आदेशीत केले. त्यानुसार गटविकास अधिकारी वडवणी यांनी रितसर सुनावणी घेवुन दि.26 डिसेंबर 2022 रोजी बेकायदेशीररित्या तयार केलेले शिवार भाटवडगांव मधील सर्व्हे नं.74 मधील प्लॉट नंबर 55 ते 62 हे रद्द करण्याचा आखेर आदेश देण्यात आला.
यासाठी लढा देण्यासाठी गावकरी मंडळीमध्ये प्रामुख्याने गौतम शंकर बादाडे यांनी पुढाकार घेतला. तर त्यांना सुनिल मगर, दिलीप सोळंके, निशांत साळवे, अनिल बादाडे, गोरक्षनाथ बादाडे, विठोबा बादाडे, राजेभाऊ बादाडे, गोविंद बादाडे, उध्दव बादाडे, भागवत बादाडे व समस्त गावकरी मंडळींनी संबंधीत लढा हा शेवटपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. तसेच कायदेशीररित्या लढण्यासाठी व पुर्ण कायदेशीर बाबीची पुर्तता करण्यासाठी ॲड.ए.जी. बादाडे यांनी त्यास सहकार्य केले.

Leave a Reply