फसवणूक टाळण्यासाठी … तुमच्या आधार कार्ड बाबत ही घ्या काळजी !

Spread the love

‘युआयडीएआय’ कडून सूचना जारी

आपल्या दैनदिन कामकाजात आधार कार्डचे महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, आत्ता यामध्ये फसवणूकीचे प्रकारही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता आधार कार्ड वापरताना काळजीही घेतली पाहिजे. ‘यूआयडीएआय’कडून याबाबत महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड, तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जशी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधार कार्डच्या वापराबाबतही बाळगन्याचे सागितले आहे. त्यात आधार क्रमांक वापरल्यानंतर मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या आधार-ओटीपीची माहिती इतर कोणालाही देऊ नका. शिवाय एम-आधारचा पिन नंबरही इतरांसोबत शेअर करू नका. आधार कार्डची झेरॉक्स किंवा त्याची प्रत कोठेही ठेवू नका. बरोबरच आपले आधार कार्ड सोशल मीडियावर शेअर करू नका.
आधार कार्डचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास, 1947 या क्रमांकावर फोन करुन माहिती द्या. तसेच help@uidai.gov.in यावर ई-मेल करूनही तक्रार देता येईल.

Leave a Reply